ग्रंथालय भेट
ग्रंथालय
म्हणजे महाविद्यालयाचा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. अभ्यासाबरोबरच
विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे त्यामुळे मानसशास्त्र
विषयाच्या पुस्तकांबाबत अधिक जाणून घेण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या
महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे कामकाज, ई-बुक
विषयी माहिती घेण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील बी.ए. भाग- २
मधील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट आयोजित केली होती.
त्यानुसार
बुधवार दि.२१/१०/२०२२
रोजी ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथपाल श्री. आर.
जे.
इंगवले यांनी ग्रंथालयातील पुस्तकांची देवघेव प्रक्रिया N-List ची
प्रक्रिया,
ई-बुक
ची माहिती दिली.त्यानंतर आम्ही ग्रंथालयातील मानसशास्त्रविषयी, नियतकालिकांविषयी
विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या शंका विचारल्या व सर्व भेटीबाबत समाधान व्यक्त
केले.
बी.
ए.
भाग-
२ मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मानसशास्त्र
विभागातील प्रा. नूतन पाटील व समाजशास्त्र विषयाचे प्रा बालाजी शिनगारे ही यावेळी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment