Friday, March 1, 2024

शिक्षकेतर कर्मचार्यांची कार्यशाळा


                                                       शिक्षकेतर कर्मचार्यांची कार्यशाळा

आनंददायीकाम आणि कामातील आनंद

२७/०४/२०२३रोजीआनंददायीकाम आणि कामातील आनंद या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

महाविद्यालयातीलसर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गासाठी मानसशास्त्र विभागामार्फत करण्यात आलेप्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती वैशाली मंडपे या उपस्थित होत्या आनंददायी वातावरण ,ताणतणाव व्यवस्थापन ,आंतर वैयक्तिक नातेसंबंध ,शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि कुटूबातील संवाद या सर्व विषयावर कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर .व्ही .शेजवळ उपस्थित होतेप्रास्ताविक  श्री आदिनाथ बिराजे यांनी केले.कार्यशाळेचे आयोजन आणि पाहुण्याचा परिचय प्रा,नूतन पाटील यांनीकेला .आभार श्री बापूराव शिंगटे यांनी माणले 

प्रमुख पाहुणे सौ मंडपे यांचा सत्कार करताना 
प्राचार्य आर व्ही शेजवळ 






                                                

आत्महत्या एक चिंतन

 

                                 मानसशास्त्र विभाग

                                      "



                                              आत्महत्या एक चिंतन"

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात मानसशास्त्र विभागामार्फत “आत्महत्या एक चिंतन” या विषयावर प्रा शिवराम मेस्त्री यांचे १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर व्ही शेजवळ यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. अध्क्षस्तानी उपप्राचार्य डॉ अशोक तवर होते. याप्रसंगी महाविद्यालयातील गुरुदेव प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

या विषयावर मार्गदर्शन करत असताना मेस्त्री सर म्हणाले प्रत्येक आत्मघाती मृत्यू हि सार्वजनिक आरोग्याची चिंता असते.ज्याचा सभोवतालच्या लोकांवर गंभीर परिणाम होतो.जगभरातीलआत्महत्या प्रतिबंध करण्यासाठीदरवर्षी१० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हुणून साजरा केला जातो .”कृतीतून आशा निर्माण करणे”ही २०२१-२०२३ या जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनाची त्रिवार्षिक थीम आहे.हि थीम आपल्या सर्वांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण करणारी आहे .आत्महत्याग्रस्त संकटाचा सामना करणार्यांना किवा आत्म्हतेमुळे शोकग्रस्त झालेल्यांना समाजाचा एक सदस्य म्हणून एक मुल म्हणून ,पालक म्हणून एक मित्र,सहकारी,एक नागरिक म्हणून आपण सर्वजनमदत करू शकतो आणि प्रोसाहित करू शकतो व या आत्महत्याना प्रतिबंध घालू शकतो .

 

विभाग प्रमुख                                                    समन्वयक

 मानसशास्त्र विभाग                                            मानसशास्त्र विभाग

ग्रंथालय भेट

 

ग्रंथालय भेट 

ग्रंथालय म्हणजे महाविद्यालयाचा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे त्यामुळे मानसशास्त्र विषयाच्या पुस्तकांबाबत अधिक जाणून घेण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे कामकाज, -बुक विषयी माहिती घेण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील बी.. भाग- २ मधील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट आयोजित केली होती.

त्यानुसार बुधवार दि.२१/१०/२०२२ रोजी ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथपाल श्री. आर. जे. इंगवले यांनी ग्रंथालयातील पुस्तकांची देवघेव प्रक्रिया N-List ची प्रक्रिया, -बुक ची माहिती दिली.त्यानंतर आम्ही ग्रंथालयातील मानसशास्त्रविषयी, नियतकालिकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या शंका विचारल्या व सर्व भेटीबाबत समाधान व्यक्त केले. बी. . भाग- २ मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मानसशास्त्र  विभागातील प्रा. नूतन पाटील व समाजशास्त्र विषयाचे प्रा बालाजी शिनगारे ही यावेळी उपस्थित होते.

 

                                     जागतिक आनंददायी दिन २०२३

                                           अहवाल 



   जागतिक आनंददायी दिन २०२३ अहवाल  लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात मानसशास्त्र विभागामार्फत “जागतिक आनंददायी दिन “या विषयावर २०मार्च २०२३रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत प्रा नूतन पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले .  या विषयावर मार्गदर्शन करत असतानाविद्यार्थ्यांच्याभावनाचेस्वमुल्यमापनकरण्यातआले२०मार्च हा दिवस जागतिक आनंददायी दिनम्हणून साजरा केला जातो .१२ जुलै २०१२ रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने २० मार्च हा जागतिक आनंद दिन म्हणून घोषित केला.२०२३ च्या आंतरराष्ट्रीय दिनाची मुख्य संकल्पना सजग राहा , दयाळू व्हा . भारत २०२१ च्या अहवालातील १३९ क्रमांकावरून २०२२ आवृत्ती मध्ये १३६ व्या क्रमाकावर गेला आणि २०२३आवृत्ती मध्ये तो १२६ व्या स्थानावर पोहचला. आनंददायी वातावरणामुळे तान तणाव ,चिंता,निराशा दूर होते .कोणतेही काम आनदाने केले तर काम चांगले होते .दररोज काही सकारात्मक भावना चा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो .आनंददायी जीवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या कार्यक्रमासाठी महाविदयाल्याचे प्राचार्य आर .व्ही .शेजवळ सर तसेच उपप्राचार्य तवर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षकेतर कर्मचार्यांची कार्यशाळा

                                                        शिक्षकेतर कर्मचार्यांची कार्यशाळा आनंददायीकाम आणि कामातील आनंद २७ / ०४ / २०२३ रोजी आ...