Thursday, February 29, 2024

मानसशास्त्र विभाग अहवाल

 

मानसशास्त्र विभाग अहवाल

शेक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये मानसशास्त्र विभागामार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . २५ ऑगस्ट २०२२ ला बी ए १ च्या वर्गात मानसशास्त्र संधी आणि उपयोजन या विषयावर मुलांना मार्गदर्शन करणात आले . दिनाक ५ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिनानिमित बी ए १  आणि बी ए २ च्या विद्यार्थ्यांनी वर्गात मानसशास्त्र अध्यापनाचे कार्य केले ,तसेच मानसशास्त्र विभागामार्फत “आत्महत्या एक चिंतन” या विषयावर माजी मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा शिवराम मेस्त्री यांचे १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले . या विषयावर मार्गदर्शन करत असताना मेस्त्री सर म्हणाले प्रत्येक आत्मघाती मृत्यू हि सार्वजनिक आरोग्याची चिंता असते.ज्याचा सभोवतालच्या लोकांवर गंभीर परिणाम होतो.जगभरातील आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी१० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हुणून साजरा केला जातो .”कृतीतून आशा निर्माण करणे”ही २०२१-२०२३ या जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनाची त्रिवार्षिक थीम आहे.हि थीम आपल्या सर्वांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण करणारी आहे .आत्महत्याग्रस्त संकटाचा सामना करणार्यांना किवा आत्म्हतेमुळे शोकग्रस्त झालेल्यांना समाजाचा एक सदस्य म्हणून एक मुल म्हणून ,पालक म्हणून एक मित्र,सहकारी,एक नागरिक म्हणून आपण सर्वजनमदत करू शकतो आणि प्रोसाहित करू शकतो व या आत्महत्याना प्रतिबंध घालू शकतो . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर व्ही शेजवळ यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

१० ऑक्टोंबर २०२२ जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित बी ए च्या विद्यार्ह्यांकडून मानसशास्त्रीय स्वास्थ्य चाचणी सोडवून घेण्यात आली .

शिक्षकेतर कर्मचार्यांची कार्यशाळा

                                                        शिक्षकेतर कर्मचार्यांची कार्यशाळा आनंददायीकाम आणि कामातील आनंद २७ / ०४ / २०२३ रोजी आ...